शाळेचे स्थापना वर्ष

शाळा मान्यता क्र.नमाशा-१०९९[७४६/९९ मा.शि.१ दि.९ जुलै १९९९

शाळा सांकेतांक-२१.०९.०५०

ग्रामीण व दुर्गम अशा आटोली ,पाचगणी,काहीर, दिक्षी ,गुरेघर ,आंबेघर ,बाहे, गोकुळ,वरंडेवाडी , वर्पेवाडी आंबेघर,धावडे व कोरडेवाडी भागातील  मुला-मुलींच्या शिक्षणाची खूप आबाळ होत होती . 

त्यांना पाचवी पासूनच्या पुढील शिक्षणासाठी मोरगिरी किंवा पाटणला पायपीट करावी लागे .या मुला-मुलींची पायपीट होऊ नये म्हणून या सर्व गावांतील ग्रामस्थांनी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष मा.शंभूराज देसाईसाहेब यांच्याकडे या दुर्गम भागात विद्यालय सुरु करण्याची विनंती केली.

या विनंतीचा स्वीकार करून सन-१९९८ या साली धावडे या गावातील श्री येडोबा मंदिरामध्ये शाळा सुरु करणेत आली.

पुढच्याच वर्षी दि.९ जुलै १९९९ रोजी  या शाळेस मा.शंभूराज देसाईसाहेब यांनी प्रशासकिय मान्यता मिळवून दिली.

 

 

शाळेचे कार्यक्रम आणि बातम्या