न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्री पी एल केंडे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनाविषयी विद्यालयातील विद्यार्थीनींनी ,श्री.घोणे सर व मुख्याध्यापक मा.श्री.केंडे सर यांनी मनोगते व्यक्त केली. राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त 100 सेकंद मौन उभे राहून अभिवादन केले. यावेळी लो.बा.दे.फौ.चे सचिव श्री.कुंभार एन.एस.,श्री.शेजवळ एस.डी व सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.घोणे सर व आभार सौ.पवार मॅडम यांनी मानले.






