पाटण-मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई दादा यांचे मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आजी-माजी विदयार्थी यांचा स्नेहमेळावा
व विदयालयाची माजी विदयार्थिनी टी.व्ही.स्टार कु.सोनम लोहार व त्यांचे सहकारी यांचा दिवाळी पहाट असा सुमधुर भक्तीगीते,भावगीतांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमावेळी विदयालयांतील आजी-माजी विदयार्थ्यांचा उत्फूर्त प्रतिसाद होता, या कार्यक्रमादरम्यान विदयालयातील सर्व विदयार्थ्यांनी शालेय परिसरात ५०१पणत्या लावून दीपोत्सव साजरा केला,
दिवाळी पहाट या कार्यक्रमांत गणेश स्तवन,उष:काल होता होता..,भुलले रे क्षण माझे ,आईचा जोगवा,शंभो शंकरा, या गीत गायनाने उपस्थितांची मने जिंकली,यावेळी या कार्यक्रमांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्री.बाळासाहेब पाटील, मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ,माजी प्राचार्य श्री.नवनाथ पानस्कर,प्रा.श्री.अजित देशमुख,मा.श्री.नथुराम कुंभार, श्री.जे.एस.मदने,श्री.के.के. जमदाडे,श्री.शरद शेजवळ,श्री.लखन पाटील,श्री.प्रकाश शेजवळ श्री.धनाजी केंडे तसेच, सोनवडे गावचे सरपंच सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते, या कार्यक्रमाचे स्वागत श्री.संतोष कदम यांनी केले,तसेच विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एल केंडे सर यांनी मनोगत व्यक्त केले,तर आभार श्री.संजय डोंगरे यांनी मानले,या कार्यक्रमासाठी सर्व आजी-माजी विदयार्थी, मोरणा सेवक, शिक्षक वृंद ,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते




