रामानुजन हे थोर गणित तज्ञ होते – मा.श्री.पी.एल. केंडे

पाटण – मोरणा शिक्षण  संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे  या विद्यालयामध्ये थोर गणित तज्ञ यांची जयंती राष्ट्रीय गणित  दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल. केंडे सर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते,यावेळी ते म्हणाले की,रामानुजन हे थोर गणित तज्ञ होते,त्यांना अल्पायुष्य लाभले, परंतु जगाला एक आदर्श निर्माण करून दिला,त्याचे गणितीय कार्य महान होते, असे ते यावेळी म्हणाले,या कार्यक्रमावेळी  कु.एस.एस.मनेर,श्री संजय डोंगरे, श्री.प्रवीण उदुगडे,श्री. रामचंद्र कदम यांनी मनोगत वक्त केले,तसेच विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले,यावेळी गणिती गीते, शब्दकोडी,प्रश्नमंजुषा,गणितीय लग्नपत्रिका, गणिती उखाणे घेण्यात आली,या कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री संतोष कदम यांनी केले तर आभार श्री संजय डोंगरे यांनी मानले,व सूत्र संचालन कू. सानीका पाटील या विद्यार्थीनीने केले,या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते,
copyright © 2021-2024 | मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी ता.पाटण जि.सातारा
Scroll to Top