न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयाचे खो-खो स्पर्धेत घवघवीत यश

 

पाटण येथे झालेल्या पावसाळी स्पर्धेत तालुका स्तरावर खो-खो या खेळामध्ये विद्यालयाच्या 14 वर्षाखालील मुले खो-खो या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त करुन जिल्हा स्तरावर निवड झाली.तसेच 17 वर्षाखालील मुले खो-खो हा संघ उपविजेता ठरला.या यशस्वी संघातील खेळाडु मुलांना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री.घोणे सर यांचे मार्गदर्शन लाभले.संघातील सर्व  खेळाडु व मार्गदर्शक शिक्षकया यांची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली.

सर्व यशस्वी संघातील मुलांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचे ना.मा.श्री.शंभूराज देसाई साहेब,उत्पादन शुल्क मंत्री व पालकमंत्री (सातारा व ठाणे जिल्हा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा),लो.बा.दे.स.सा.मरळीचे चेअरमन व युवा नेते मा.श्री.यशराज देसाई (दादा),युवा नेते मा.श्री.जयराज देसाई (दादा),युवा नेते मा.श्री.आदित्यराज देसाई(दादा) ,मोरणा शिक्षण संस्थेंचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ(दादा) मुख्याध्यापक मा.श्री.केंडे पी.एल.  लो.बा.दे.फौंडेशनचे सचिव मा.श्री.कुंभार एन.एस.,वरिष्ठ शिक्षक मा.श्री.शेजवळ एस.डी.,सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी  यांनी अभिनंदन केले.

copyright © 2021-2024 | मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी ता.पाटण जि.सातारा
Scroll to Top