मोरणा शिक्षण संस्थेची निकालाची परंपरा कायम

हार्दिक अभिनंदन           दि.०२/०६/२०२३

मोरणा शिक्षण संस्थेची निकालाची परंपरा कायम

पाटण -माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मोरणा शिक्षण संस्थेने निकालाची परंपरा कायम राखली आहे,

यामध्ये शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयाचा निकाल 95.16 टक्के लागला असून कु. आदिती निवास पानस्कर-  88.80%(प्रथम),कु. प्रतिक्षा लक्ष्मण मळेकर – 88.40%(द्वितीय),कु. साक्षी संतोष शेजवळ – 86.40%(तृतीय),

तसेच न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयाचा निकाल 100टक्के लागला असून कु. पवार रूपाली संजय 86.00% (प्रथम),कु. यादव रसिका सुरेश – 84.60%(द्वितीय),गालवे रोहित सुनील  – 82.60%(तॄतीय),त्याचप्रमाणे न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी या विदयालयाचा निकाल 100टक्के लागला असून रसिका उत्तम भिसे 81.56%(प्रथम),नम्रता पांडुरंग भिसे 79.34% (द्वितीय),विदीपा बापुराव भिसे 78.63%(तृतीय),

तसेच वत्सलादेवी इंग्लिश मिडिअम स्कूल दौलतनगर या इंग्रजी माध्यमाच्या विदयालयाचा सलग तीन वर्षे 100टक्के निकाल लागला असून सांळुखे श्रृती दिपक  87.60%(प्रथम),भिसे शुभम धनाजी 86.40%(द्वितीय), जाधव अमृता श्रीमंत 84.00%(तृत्तीय)असे विविध शाखेतील विदयार्थ्यांनी सुशय संपादन केलेले आहे,त्याबद्दल सर्व यशस्वी विदयार्थी,त्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद,तसेच पालक वर्ग या सर्वांचे  महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय रविराज देसाई दादा,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई दादा,युवा नेते जयराज देसाई दादा,संस्थेचे उपाध्यक्ष भरत सांळुखे,सचिव डी.एम.शेजवळ,लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव एन.एस.कुंभार ,सर्व संचालक मंडळ,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी यांनी यशस्वी सर्व विदयार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले,व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

copyright © 2021-2024 | मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी ता.पाटण जि.सातारा
Scroll to Top