*शाळा हे संस्काराचे खरे विदयापीठ-मा.श्री.रविराज देसाई* 

पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयाचा एस.एस.सी.विदयार्थी शुभचि़तन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा हे होते,त्यावेळी ते म्हणाले आई-वडीलानंतर शाळा हे प्रत्येक विदयार्थ्या़ला खरे शिक्षण, संस्कार देत असते,त्याचा भविष्यकाळात विदयार्थ्यांने वापर केला पाहिजे,असे मत यावेळी व्यक्त केले,या कार्यक्रमांसाठी मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ,तारळे गावचे सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.अभिजित पाटील,लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव मा.श्री.एम.एस.कुंभार,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.श्री.शंकर पाटील,न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालय मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल.केंडे ,न्यू इंग्लिश नाटोशी चे मुख्याध्यापक मा.श्री.आर.एन.कदम,प्राचार्य मा.श्री.वैभव कांबळे,प्राचार्य मा.श्री.अजित शिंदे,मुख्याध्यापिका योगिता संकपाळ,लखन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती,
या कार्यक्रमावेळी विदयालयाचे माजी मुख्याध्यापक मा.श्री.एस.आय.मुजा‌वर,विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.के.जे.चव्हाण,तसेच विदयालयातील विदयार्थिनी वैष्णवी कुंभार,तनुजा शेजवळ,प्रतिक्षा मळेकर,साक्षी शेजवळ यांनी मनोगते व्यक्त केली,यावेळी एन.एम.एम.एस.परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा प्राप्त विदयार्थी,तसेच हिंदी बाह्य परीक्षा,शालेय क्रीडा स्पर्धा त्याचप्रमाणे विविध शालेय सहशालेय उपक्रमांमध्ये नैपुण्य प्राप्त केलेल्या विदयार्थ्यांचा प्रमाणपत्र,व पुष्पगुच्छ देवून सत्कार करणेत आला,या कार्यक्रमाचे प्रास्ता‌विकपर स्वागत विदयालयाचे उपशिक्षक संतोष कदम यांनी केले,तर आभार संजय डोंगरे यांनी मानले,या कार्यक्रमांसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग ,आजी-माजी विदयार्थी,पालक उपस्थित होते.
copyright © 2021-2024 | मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी ता.पाटण जि.सातारा
Scroll to Top