मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे ता.पाटण विद्यालयात अपुर्व विज्ञान मेळाव्याचे उद्धाटन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या मेळाव्याच्या उद्धाटनाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.केंडे सर यांनी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई यांचे स्वागत केले.या विज्ञान मेळाव्याची अध्यक्ष महोदयांनी पाहणी केली व आपल्या मनोगतात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.प्रास्ताविक उपक्रमशील शिक्षक श्री.कुंभार सर यांनी केले.आभार श्री.घोणे सर यांनी मानले.या विज्ञान मेळाव्यात 90 उपकरणे मांडण्यात आली होती.तसेच विज्ञानावर आधारीत 60 रांगोळ्या साकारण्यात आल्या.परिसरातील विषारी व बिनविषारी साप,प्राणी,आकाशगंगा यावर आधारीत फिल्म या मेळाव्याचे खास आकर्षण ठरले.हा अपुर्व विज्ञान मेळावा पाहण्यासाठी विद्यालयाच्या परिसरातील धावडे,कोरडेवाडी,गोकुळ,शिद्रुकवाडी,आंब्रग या प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.तसेच वत्सलादेवी देसाई सिनीअर काॅलेज चे प्राध्यापक व शिवाजीराव देसाई विद्यालयाचे शिक्षक , न्यू इंग्लिश स्कूल,नाटोशीचे शिक्षक तसेच पालक,विद्यालयाचे माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी आवर्जुन उपस्थित होते.हा विज्ञान मेळावा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.केंडे सर,वरिष्ठ शिक्षक श्री.शेजवळ सर ,उपक्रमशील विज्ञान शिक्षक श्री.कुंभार सर व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.











