मोरणा शिक्षण संस्थेचा तंत्रस्नेही शिक्षक व मुखाध्यापक यांची आनलाईन कार्यशाळा शुक्रवार दि. १४/१०/२०२२ रोजी दुपारी २.००वा.संपन्न झाली.या कार्यशाळेचे प्रस्थाविक शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाचे उपशिक्षक श्री.संतोष कदम सर यांनी केले व स्वागत न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे पस उपशिक्षक श्री.विकास लोहार सर यांनी केले .या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक श्री.नारकर सर (श्री सॉफ्टवेअर सोल्युशन्स अँड ट्रैनिंग सेन्टर , पाटण ) होते ,त्यांनी बदलत्या काळातील आनलाईन माहिती अपलोड करणे,वेबसाईट माहिती अपडेट्स कशी करावी,या विषय सखोल मार्गदर्शन केले, तसेच तंत्रस्नेही शिक्षकाचे शंका समाधानाचे निरसन केले ,या तंत्रस्नेही कार्यशाळेचे आभार न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी या विद्यालयाचे उपशिक्षक श्री. सचिन कदम सर यांनी मानले ,या कार्यशाळेसाठी सर्व तंत्रस्नेही शिक्षक व मुख्याधापक उपस्थित होते.






