पाटण तालुक्यातील दुर्गम गावागावात शिक्षणाची गंगा पोहचावी यासाठी ९ जुलै १९८२ रोजी स्व .शिवाजीराव दौलतराव देसाई यांनी “ मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी” या शिक्षण संस्थेची स्थापना केली .
आज या संस्थेची ३ माध्यमिक शाळा १ इंग्रजी माध्यम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय अशा पाच शाखा आहेत .
संस्थेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नामदार शंभुराज देसाई (साहेब ) यांच्या व संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा .रविराज देसाई (दादा )यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिक्षण संस्था प्रगतीपथावर अग्रेसर आहे .
पाटण तालुक्यातील विद्यार्थ्यांना या शिक्षण संस्थेमुळे रोजगाराभिमुख आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष ,संचालक हे नेहमी आग्रही असतात .
संस्थेची उद्दिष्टे
- ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांनां दर्जेदार शिक्षणांची सोय करणे.
- विद्यार्थ्यांचा सामाजिक,शैंक्षणिक,बौद्धिकदृष्टया सर्वांगीण विकास करणे.
- गामीण भागात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणे.
- विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास साधण्यासाठी मूल्यधिष्ठित शिक्षण देणे.
- स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकण्यासाठी त्यांना स्पर्धात्मक देणे.
- समाजातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना व्यवसाय शिक्षणाची सोय करणे.
- विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिदू मानून त्यांच्या सर्वागीण विकासासाठी शिक्षक-पालक यांच्यात समन्वय साधणे.
संस्थेचे स्तुत उपक्रम
- गरीब व गरजू मुलांना शैंक्षणिक साहित्यांचे वाटप
- एक-मुल एक झाड – वृक्षारोपन कार्यक्रम
- पाटण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी सत्कार ( 12 जुलै स्व.शिवाजीराव देसाई पुण्यतिथी)
- लोकनेत्याच्या कार्याची ओळख -चित्ररथ
- आध्यात्मिकतेची जोड- ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
- गरीब व गरजू मुलींना वत्सलादेवी देसाई शिष्यवृत्ती योजना
- शिवाजीराव देसाई विद्याप्रबोधिनी(स्पर्धा परीक्षा)
- मोरणा पटर्न
- मुकबधीर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
